






शाळेला जाऊया
---------------------------------------------------
मोफत पुस्तके मिळत्यात....
मोफत गणवेश मिळतोया....
शालेय,पोषण आहार
आहार,शाळेत खाऊया......
शाळेला,शाळेला जाऊया
जिल्हा परीषद,शाळेला जाऊया.!!१!!
आरोग्य सेवा ,मिळतीया......
आपघाती विमा मिळतोया....
मोफत,मोफत औपरेशन.
औपरेशन,करुन घेऊया......
शाळेला,शाळेला जाऊया
जिल्हा परीषद,शाळेला जाऊया.!!२!!
मुला-मुलीनां भत्ता मिळतोया.
मुलीना सायकली भेटलेया..
सरकारी,सरकारी योजना
योजना,शाळेत राबुया.
शाळेला,शाळेला जाऊया
जिल्हा परीषद,शाळेला जाऊया.!!३!!
बालआनंद मेळावा घेऊया.
शिक्षण महोत्सव राबऊया.
वेगवेगळ्या स्पर्धा चं,आयोजन
आयोजन,शाळेत करुया
शाळेला,शाळेला जाऊया
जिल्हा परीषद,शाळेला जाऊया.!!४!!
तज्ञांचे मार्गदर्शन घेऊया..
संग..णकाचा वापर करुया
सोन्याचे,सोन्याचे दिवस
मराठी शाळाना
असे दिवस आनुया.....
शाळेला,शाळेला जाऊया
जिल्हा परीषद,शाळेला जाऊया.!!५!!
आपलाच......
श्री.दत्ता आम्रित (पाटील )
पाथरी.परभणी
९४०३०६३८२२
दि.१८.०४.२०१५
शाळेला जाऊया हि कविता माझ्या आवाजात ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
---------------------------------------------------
---------------------------------------------------
सूचना
------------------------
मी लिहिलेली शाळेला जाऊया हि कविता आपणास नक्की आवडली असेल च. आवडल्यास खाली Enter Your Comment या ठिकाणी Comment Box मध्ये आपला अभिप्राय लिहून Publish करायला विसरू नका ..
......धन्यवाद.....
Deep Education's World -9403063822
No comments:
Post a Comment