संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

07/02/2016

शिक्षण परीषद परभणी 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 आज दि.06.02.2016 रोजी. परभणीमध्ये मा.शिक्षण आयुक्त डाँ.पुरुषोत्तम भापकर साहेब यांची शिक्षण परिषद पार पडली.या शिक्षण परिषदेत मी मा.आयुक्त साहेबांसमोर मी सादर केलेले माझ्या शाळेचे प्रझेंटेशन....

👇🏼 💥PRESENTATION💥 👇🏼

 नमस्कार मी दत्ता आम्रित (पाटील) जि.प.प्रा.शा.टाकळगव्हाण तांडा. ता.पाथरी जि.परभणी. आपले सहर्ष स्वागत करतो. (with ppt) साधारणतः 100 ते 150 घरांची लोकवस्ती असलेल्या टाकळगव्हाण तांडा या वस्तीवर गेल्या 5 वर्षापुर्वी म्हणजेच सन 2011-12 साली 45 पटसंख्या असलेल्या वर्ग 4थी पर्यतच्या शाळेत कमी वर्ग खोल्या,अपुरे मैदान,आपुरे शिक्षक व अनंत आडचणींचा सामना करत असतानाही गुणवत्ता पुर्ण शिक्षण प्रक्रिया चालू होती.परंतु आपल्या शाळेतील मुलांसाठी काहीतरी वेगळे करावे, मुलांच्या गुणवत्तेत अजुन वाढ करावी असे नेहमी वाटायचे.. पण मार्ग दिसत नव्हता.. दरम्यान च्या काळात शाळेला सोयी सुविधा नसुनही हि शिक्षक मंडळी आपल्या शाळेसाठी,आपल्या मुलांच्या गुणवत्ते साठी खुप मेहनत घेत आहेत हि भावना काही जागृत पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर चर्चेच्या माध्यमातुन शाळेसाठी काही लोकसहभाग मिळतोय का हि चाचपणी करण्यात आली.व या सत्कार्यासाठी गावातील श्री संतराम लक्ष्मण राठोड यानी शाळेला 6 गुंठे जमिन दान दिली. हे आमचं शाळेय प्रगतीत वाढीच्या दिसेने पडलेले पहिले पाऊल.

 👉🏻नियमित आध्ययन अध्यापणापेक्षा वेगळे काही करायला पाहिजे .मुलांसाठी संगणक घ्यावे वाटायचे पण पैशाचे सोंग आणता येईना. पुन्हा लोकांचा व शिक्षकांचा आर्थिक सहभाग एकत्रित करण्याच्या प्रयत्नाची कल्पना सुचली व काही प्रमाणात यश देखिल आले..व 50-100-200-५00 असे करत करत गेल्या 3 वर्षापुर्वी रु 31हजार गावकरी व शिक्षक याची एकत्रित वर्गणी जमा झाली व एक शाळेसाठी संगणक विकत घेतले. हे शालेय प्रगतीच्य दिसेने टाकलेले दुसरे पाऊल. संगणकाच्या साह्याने 3 वर्षा पासुन शाळेत मुलाना विविध vdo ,कवितांच्या रेकाँर्डिंग शिकवत आसताना चालू वर्षी लोकसहभागातुन प्रोजेक्टर घेऊन.शै प्रगतीत वाढ झाली.

 👉🏻तांडावस्तीवर-शिक्षण प्रोजेक्टर वर ही नवी म्हण आज आमच्या परीसरात रुजविण्याचे कार्य आम्ही केलेय. 

 👉🏻विद्यार्थ्यांना अध्ययनास मदत व्हावी म्हणून ५0 पेक्षा जास्त शैक्षणिक vdo .गणिती पाढे व सर्व वर्गाच्या कविता recording केल्या असुन त्याचा नियमित वापर चालू आहे.ईतराना या साहित्याचा फायदा व्हावा म्हणून dattaamrit.blogspot.com या blog वर हे साहित्य uplodकरण्याचे काम चालू आहे. 👉🏻आज घडीला मेहनत,लोकसहभाग.नवनवे शैक्षणिक प्रयोग व उपक्रमाच्या बळावर आज माझी शाळा तांडा वस्तिवर 224 पटसंख्येसह वर्ग 1 ते 8वी पर्यतची 100% प्रगत शाळा असल्याचे अभिमानाने सांगावे वाटते 

 👉🏻शेवटी मा.भापकर साहेबांचे गुणवत्ता हे गित सादर करताना अडखळल्याने साहेबानी जवळ बोलवून स्वतःच्या हताने ताबडतोब ध्यास गुणवत्ता हे गीत कागदावर लिहुन .आवाज छान तुमचा आहे पुन्हा सादर करा आसे मा.भापकर साहेबानी सुचविले.खुप छान वाटले. शेवटी भापकर साहेबानी पुस्तक ,पुष्पगुच्छ देऊन पाठिवर कौतुकाची थाप मारली.आनंद वाटला. शेवटी कुठलेही काम शासन सांगतेय म्हणुन न करता तेच जर आनंदाने केले तर समाधान मिळते...
धन्यवाद ..
 ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖➖

💥 तत्पुर्वी  💥

 सकाळी 10 वा विश्वशांती ज्ञानपीठ,रहाटी परभणी ईथे मा.डाँ.पुरुषोत्तम भापकर साहेब(शिक्षण आयुक्त पुणे) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला.सदरील परीषदेला मा.जिल्हाधिकारी महिवाल साहेब.शिक्षण सभापती जि.प,परभणी मा.दादासाहेब टेंगसे .दै सकाळ पत्रकार महेश पाटील.विश्वशांती चे करेवार साहेब.मा. शिक्षणाधिकारी,सर्व गटशिक्षणाधिकारी .विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख उपक्रम शिल शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते. या परीषदेत बोलताना......
 ➖➖➖➖➖➖➖➖➖

 💥मा.डाँ.पुरुषोत्तम भापकर साहेब💥 
🎤👇👇➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  👇👇🎤

 परभणी जिल्याच्या गुणवत्ते वर समाधान व्यक्त केले

. 👉आपण सर्वजन मिळून गुणवता वाढवूय. 

 👉🏻मुलांची गुणवत्ता सर्व प्रथम प्राधान्य.मग ते ज्ञानरचनावाद असेल ई लर्निग आसेल. लोकसहभाग असेल.

 👉🏻चांगले कार्य करा,शासन,मा.शिक्षण मंत्री महोदय,.मा.नंदकुमार साहेब.मी स्वतः व सर्व जिल्हा परीषद चे अधिकारी आपल्या सोबत आहेत.

 👉🏻नांदेड येथिल zpguruji.com निर्माते .तंत्रस्नेही शिक्षक सुनिल आलुरकर यानी शिक्षका ना अध्यापणात येणार्या अडचणी वर मात करत तंत्रज्ञान च्या माध्यमातुन शिक्षक व विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक कार्याचा विशेष उल्लेख मा.भापकर साहेबांनी परभणीला केला. 

 👉🏻 मा.शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे हे लोकसहभागासाठी रात्रीच्या वेळी पालकसभा घेत असल्याचे मा.भापकर साहेबानी कौतुक केले.. 

 👉🏻 ज्यानी आज सादरीकरण केले त्यांचे अभिनंदन.पण बाकीच्यांचे काय?...आपले काम मला कधी दाखवणार? असे विचारताच .पुढील वेळी सादरीकरण साठी चढाओढ दिसावी असे मत साहेबानी व्यक्त केले. 

 👉🏻प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा महत्वापुर्ण कार्यक्रम सर्वजन मिळून यशस्वी करु.

 👉🏻आज पर्यत बर्याच शाळा कुणी 50% कुणी 80%प्रगत अहात . पण 100%कधी..? यावर अपणास विशेष कार्यक्रम आखुन येत्या मार्च एप्रिल अखेर आपल्या जिल्यातील सर्व मुले प्रगत व्हावीत . 

 👉🏻महाराष्ट्र भर चालू असलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम मध्ये शिक्षक नवनवे उपक्रम राबवत अस्याचे शिक्षका प्रति गौरव उद्गार काढले 

 👉🏻शिक्षणा ची वारी अंतर्गत राज्यभरातील नवोपक्रम,तंत्रज्ञान पहाण्याची संधी मिळाली त्याचे नियोजन आपल्या शाळेत उपयोग होण्यासाठी प्रयत्न करा.

 👉 शिक्षण सभापती टेंगसे साहेब यानी गुणवत्ता पुर्ण शिक्षण साठी जिल्ह्यातील शिक्षका सोबत मेहनत घेत असल्याचे प्रथमच पहातोय .

 👉 आपल्याला शाळाबाह्य मुल शाळेत टिकवायचेय.प्रगत करायचेय.

 👉🏻 सर्व अधिकारी,शिक्षक खुप मेहनत घेत असल्याने अभिनंदन सर्वांचे

 💥ईतर सादरीकरण💥 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 परभणी डायटचे प्राचार्य मा.साबळे साहेब. गटशिक्षणाधिकारी पुर्णा भुसारे साहेब, विस्तार अधिकारी मुकेश राठोड. . मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख शिक्षक यानी आपले उत्कृष्ट सादरीकरण मा.भापकर साहेबांसमोर सादर केले. धन्यवाद 

 👉थेट मा.डाँ.पुरुषोत्तम भापकर साहेबांच्या परभणी येथे आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेतुन 

 💥श्री दत्ता आम्रित (पाटील) परभणी 9403063822
-------------- ------------------------------------------------

 @copyright 2015-2016 - सदरील पोष्ट स्वलिखित असुन माझ्या blog वर पुर्वप्रसारीत व सुरक्षिता करण्यात आलेली आहे. कृपया edit करुन मुळ पोष्ट मध्ये बदल करुनcopy paste करु नये.

No comments:

Post a Comment