संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

01/10/2017

-----------------------------------------------
NAS -नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण 
-----------------------------------------------
          थोडक्यात माहिती पाहू या


प्रश्न:- N.A.S चाचणी/सर्वेक्षण किती तारखे ला होणार आहे ?
उत्तर:-  N.A.S चाचणी/सर्वेक्षण दि. 13 नोव्हेंबर 2017 होणार आहे

प्रश्न:- N.A.S हया  चाचणी/सर्वेक्षण चे कार्यक्षेत्र किती व कोणते आहे ?
उत्तर:- N.A.S हि चाचणी/सर्वेक्षण देशभरातील  प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे

प्रश्न:- प्राथमिक शाळेतील कोणत्या वर्गाची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- प्राथमिक शाळेतील इ. 3 री व 5 वी च्या वर्गाची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे

प्रश्न:- उच्च प्राथमिक शाळेतील कोणत्या वर्गाची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग 8 वी च्या  वर्गाची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे

प्रश्न:- प्रत्येक जिल्ह्यात वर्ग तिसरी व पाचवी च्या किती वर्गांची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- प्रत्येकी जिल्ह्यात  वर्ग तिसरी व पाचवी च्या प्रत्येकी  61 + 61 = 122 वर्गांवर  चाचणी/सर्वेक्षण होणार आहे   

प्रश्न:- प्रत्येकी जिल्ह्यात वर्ग आठवी च्या किती वर्गांची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- प्रत्येकी जिल्ह्यात वर्ग आठवी च्या  51 वर्गांवर हे चाचणी/सर्वेक्षण होणार आहे.

प्रश्न:- प्रत्येकी जिल्यात  वर्ग तिसरी व पाचवी व आठवी  च च्या किती वर्गांची  चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- प्रत्येक जिल्ह्यातील एकूण 61+61+51= 173 वर्गांवर हे चाचणी/सर्वेक्षण होणार आहे.

प्रश्न:- या  चाचणी/सर्वेक्षण दुसरे नाव काय आहे
उत्तर:- या चाचणी/सर्वेक्षणाला राष्ट्रीय संपादणूक चाचणी असेही म्हणले जाते.

प्रश्न:- ह्या चाचणी/सर्वेक्षण ला प्रत्येक जिल्ह्यातील शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यांनी कसे निवडले आहेत
उत्तर:- ह्या चाचणी/सर्वेक्षण साठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यांनी स्वतः Random पद्धतीने निवडलेले आहेत.

 -----------------------------------------------

📌 शाळा निवडताना NCERT कडून S,R1 आणि R2 या प्रकारात शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

📌 S (selected), R1 (reserve 1) आणि R2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार शाळा फायनल केल्या जातील.

📌 या सर्वेक्षणाअंतर्गत निवडलेल्या शाळेतील निवडलेल्या वर्गामध्ये दि. 13 नोव्हेंबर 2017 रोजी चाचणी होणार आहे.

📌 चाचणीचे स्वरूप:- objective/MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.

📌 इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन विषयावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे (वेळ 60 मिनीट)

📌 इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र  (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार विषयावरआधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)

📌 चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न  इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणारच आहेत

📌 या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर DMU (District Monitoring Unit) स्थापन केले आहे. यामध्ये DIECPD प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.

📌 चाचणीच्या दिवशी हे DMU भरारी पथक म्हणून जिल्हास्तरावर काम करेल, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे.

📌 चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. यांच्या मार्फतच संबधित वर्गाची चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे.

📌 आपल्या शाळांसाठी उपलब्ध करून दिलेले पर्यवेक्षक (F.I.) चाचणीच्या एक-दोन दिवस अगोदर आपल्या शाळेला भेट देतील व शालेय स्तरावर झालेल्या चाचणी संबधीच्या नियोजनाची पहाणी करतील.

📌 प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी चाचणी च्या एक दिवस अगोदर जिल्हा/तालुका स्तरावरून सीलबंद स्थितीमध्येच ताब्यात घ्यायच्या आहेत.

📌 आपल्याला मिळालेल्या सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका या पर्यवेक्षकासमोरच बाहेर काढायच्या आहेत व त्यावर पर्यवेक्षकाची व दोन साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यायची आहे.

📌 निवडलेल्या वर्गातील जास्तीत जास्त 30 विद्यार्थ्यांसाठी चाचणी होणार आहे मात्र वर्गाची पटसंख्या 30 पेक्षा जास्त असतील तरीही चाचणीच्या दिवशी 100% (सर्व) विद्यार्थ्यांना हजर ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी शाळेची आहे.

📌 चाचणी सोडवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे चाचणीच्या दिवशी निळा/काळा बोलपेन असावा असे नियोजन शाळेने करावयाचे आहे
.
📌 निवडलेल्या वर्गांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्र. शाळेने आपल्या दप्तरी ठेवावे व चाचणी दिवशी आलेल्या पर्यवेक्षकाकडे द्यावेत

📌 चाचणी पूर्ण झाल्यावर पर्यवेक्षकाच्या मदतीने प्रश्नोत्तरपत्रिका व इतर साहित्याचे used unused प्रकारात वर्गीकरण करून ते दोन वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करायचे आहेत.

📌 उत्तरपत्रिकांचे हे सीलबंद लिफाफे राज्यस्तरावर जाणार आहेत.

📌 या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावर OMR पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुकानिहाय निकाल वेबसाइटवर NAS च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

📌 यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल, राज्यातील/जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे-पुढे आहे हे समजेल

📌 आलेल्या निकालावरून NCERT, SCERT आणि DIECPD यांचेकडून कृतीकार्यक्रम तयार केला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी संबधित तालुक्यांना करावयाची आहे.


हि POST पुढे शेअर करा ......

धन्यवाद

Deep Education's World - 9403063822

1 comment:

  1. कर्ज! कर्ज !! कर्ज !!!
    आपण एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त खाजगी कर्ज कंपनी शोधत आहात जो संपूर्ण आयुष्यासाठी कर्ज प्रदान करतो. आम्ही सर्व प्रकारचे कर्जे अतिशय वेगवान आणि सोप्या पद्धतीने, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज, तारण कर्ज, विद्यार्थी कर्ज, व्यवसाय कर्ज, गुंतवणूक कर्ज, कर्ज एकत्रीकरण आणि बरेच काही देत आहोत. बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी आपल्याला नाकारले आहे का? आपल्याला एकत्रीकरण कर्ज किंवा तारण गरजेची आहे का? आपल्या सर्व आर्थिक समस्यांना भूतकाळातील एक गोष्ट बनवण्यासाठी आम्ही येथे आहोत असे आणखी दिसत नाही. आम्ही 2% च्या दराने आर्थिक सहाय्य आवश्यक असलेल्या व्यक्तींसाठी आणि कंपन्यांना निधी देतो. आवश्यक सामाजिक सुरक्षा क्रमांक आवश्यक नाही क्रेडिट तपासणी आवश्यक, 100% हमी. मी तुम्हाला या माध्यमाचा उपयोग करून सांगू इच्छितो की आम्ही विश्वसनीय आणि सहायक मदत देतो आणि आम्हाला तुम्हाला कर्ज देण्यास आनंदच होईल.
    मग आम्हाला एक ईमेल पाठवा: (victoriaemmanuelloan@gmail.com) कर्जाकरता अर्ज करण्यासाठी

    ReplyDelete