संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

27/04/2018

पण तेव्हा वेळ निघून गेलेली आसते...
लेखन-
श्री.दत्ता आम्रित(पाटील)
पाथरी परभणी
9403063822
आज एक चहाच्या टपरी वर शेजारी चहा घेत बसलेल्या दोन तरुण मित्रांचे बोल काना वर पडत होते..त्यांचे बोलणे चालु आसताना त्यांच्यातील एकाच्या बोलण्यातील एक न एक शब्द वेदना दायी स्वरात होता.दूसरा त्याची समज काढत होता.त्याचे बोलने माझ्या ही काळजाला नकळत भिडत होते..
पण त्यातले एक वाक्य माझ्या ही काळजात घर करुन गेलं..आणी मनात विचारांचे काहुर माजले
ते वाक्य असे होतं.....,
"लहानपणी म्या जर आई बापाचं ऐकलं असते तर आज माझ्या वर हे दिवस पहायची येळ नसती आली..."
दोन दिवसापासून सगळीकडे रिमझिम पाऊस चालू होता.आभाळ भरुन आले होते.पाऊस केव्हा हि कोसळू शकतो.म्हणुन मी गाडीला किक मारली आणि तीथुन निघालो, गाडीवर निघाल्यावर विचार करु लागलो..
खरचं,आपण लहाण आसताना,लहान पणी प्रत्येक आई वडील आपल्या मुलाना सर्व चांगल्या गोष्टी सांगतात,चांगले संस्कार देतात.चांगल्या वाईट गोष्टी शिकवतात.पण मुलांना त्याची जाणीव अथवा त्या शिकवणीचे महत्व व परिणाम तेव्हा न कळता ते थेट  तरुण वयात आल्यानंतर 20-22 व्या वर्षी जाणवायला लागतात....
उदा.लहाणपणी आई वडील सांगतात "बाळा चांगला आभ्यास कर" "खोट बोलू नये" "दारु सिगारैट हि वाईट व्यसणे आसतात" "चोरी करु नये" मुलाना त्यांच बोलणे तेव्हा खटकते,मुले ऐकत नाही.पण जेव्हा बाहेरच्या समाजात वावरयला लागतात.समज येते,समाजाशी,व्यवहाराशी दोन हात करण्याची वेळ येते,नाना आडचणीना सामोरे जावे लागते.कष्ट.मेहनतीची सवय नसताना आशी जबाबदारी अंगावर येउन पडते,तेव्हा खूप तारांबळ उडते. आई वडीलांची लहनपणीची शिकवण,विचार मार्गदर्शन आठवते..
पण वेळ गेलेली आसते...
या वरुण मला एक बाब जाणवली...
खरच का ?
आई वडीलानी लहानपणी दिलेले संस्कार मार्गदर्शन हे मुलांच्या कानापर्यत पोहचायला,व त्याना ते समजायला,उपयोगात आणायला एवढे कमी स्पिड..
तब्बल 20-22 वर्ष लागतात..?
मानसशास्त्रीय दृष्टीने यावर प्रत्येकाला विचार करायला हवा..आपल्या मार्गदर्शन,संस्कार,शिकवण  मुलांच्या कानापर्यत जायचे व प्रत्यक्षात ते कृतीत उतरावायाचे स्पिड मिटर ठरवण्याची वेळ आज आलीए.,
 ही पोष्ट  वाचणार्या सर्व पालकांनी या बाबीचा जरूर विचार करावा.
एव्हाना गाडी घरापर्यत पोहचली होती..डोक्यात चालू आसलेल्या विचारचक्रात घरी कधी पोहचलो ते समजले देखिल नाही..

Share To All Parents...........

No comments:

Post a Comment