शाळासिध्दी ग्रेडेशन बाबत नवी संक्षिप्त माहिती
स्वयंमूल्यमापन - राज्यातील 99700 शाळांचे पूर्ण झालेले आहे.
स्वयंमूल्यमापनानुसार या शाळांचे ग्रेडेशन देखिल झालेले आहे.
एकून सात क्षेत्र व 46 गाभामाणके आहेत.46 गाभामानकांसाठी
गुणनिश्चिती ची नवी पद्धत खालिलप्रमाणे
स्तर 1 असल्यास 1 गुण
स्तर 2 असल्यास 2 गुण
स्तर 3 असल्यास 3 गुण
स्वयंमूल्यमापण झालेल्या प्रत्येक शाळेला कमित कमी 46 व जास्तीत जास्त 138 गुण मिळतात.
टक्केवारी
81 % ते 100 % ए ग्रेड
50 % ते 80 % बी ग्रेड
50 % पेक्षा कमी सी ग्रेड
अशाप्रकारे
त्यानुसार राज्यातील 34491 शाळा ए ग्रेडमध्ये आलेल्या आहेत.
आपल्या शाळेचा ग्रेड असा काढा
शाळासिध्दी ए ग्रेड शाळांना 138 पैकी मिळालेले गुण दर्शविले आहे. या गुणाला / पाॅईंटला 1.38 ने भाग दिल्यास टक्केवारी समजते.
उदा.
112 ÷ 1.38 = 81.15 %
महत्वपुर्ण
क्षेत्र क्रं 1 मध्ये दोन भाग आहेत.भाग 1 व भाग 2. या दोन्ही भागाना डॕशबोर्ड वर भाग 1 ला 36 तर भाग 2 ला 72 असे दोनदा गुणदान आहे..परंतु आपणास असे 2 वेळा गुण घेता येणार नाही.
भाग 1 ची उपयोगीता भाग 2 मध्ये दर्शविलेली आहे....भाग 1 महत्वाचा पण भाग 2 चे गुण ग्राह्य धरले जातील ... क्षेत्र एक मधील हे दोन्ही गाभामानक एकच आहे
म्हणुन फक्त भाग 2 चेच गुण ग्राह्य धरले आहेत.
लवकरच
या शाळांचे बाह्यमूल्यमापन प्रस्तावित आहे.
न्यूपा नवी दिल्ली शाळासिध्दीच्या वेब पोर्टलवर बाह्यमूल्यमापन टॅब उपलब्ध करुन देणार आहे. जो पर्यंत हा टॅब उपलब्ध होत नाही तो पर्यंत बाह्यमूल्यमापनाची माहीती भरता येणार नाही. राज्याची बाह्यमूल्यमापनाची तयारी पूर्ण झालेली आहे. न्यूपा नवी दिल्ली सदर टॅब डीसेंबर कींवा जानेवारी मधे उपलब्ध करून देणार आहे.
बाह्यमूल्यमापन पूर्ण झाल्यावरच या वर्षाची स्वयंमूल्यमापनाची माहीती भरता येणार आहे.
असिफ शेख
कार्यक्रम अधिकारी,
RMSA मुंबई.
No comments:
Post a Comment